आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी साहित्य संमेलन:भारत सासणे 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, बिनविरोध निवड

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उदगीर येथे होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथाकार आणि लेखक भारत सासणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली आहे. लवकरच तारखांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यापूर्वी नाशिकमध्ये गेल्या महिन्यात 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी खगोलतज्ज्ञ जयंत नारळीकर होते.

लातूरच्या उदगीरमध्ये होऊ घातलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांची निवड करण्यात आली आहे. उदगीर येथे झालेल्या महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सन्मान आणि पुरस्कार

  • भारत सासणे हे वैजापूरला 4 एप्रिल 2010 रोजी झालेल्या 5 व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते.
  • बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे वसमत येथे 9-10 नोव्हेंबर 2014 या काळात आयोजित केलेल्या 35 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे होते.
  • नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे 14 फेब्रुवारी 2016 रोजी भरलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे समारोपीय सत्राचे अध्यक्ष पद.
  • सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने समग्र साहित्य सेवेबद्दल सूर्योदय पुरस्कार.
बातम्या आणखी आहेत...