आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:मराठवाड्यामध्ये पाच मुले बुडाली, चौघांचा मृत्यू, एकाचा शोध सुरू; फुलंब्री तालुक्यातील दोन सख्खे भाऊ बुडाले

फुलंब्री13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात तीन ठिकाणी झालेल्या घटनांत पाच मुले बुडाली. यातील चौघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वानेगाव येथे बुधवारी दुपारी आजीसोबत गिरजा नदीवर धुणे धुण्यासाठी गेलेली तिघे मुले बुडाली. यात अभिजित साहेबराव पाचवने (७) ऋषिकेश साहेबराव पाचवने (१०) या दोघांचे मृतदेह सापडले असून नीलेश अंकुश शेजवळ (६) याचा शोध सुरू होता.

तिन्ही मुलांचे आई-वडील शेतात रोजंदारी कामावर गेले होते. त्यामुळे आजी मुक्ताबाई यांच्यासोबत ते गिरजा नदीवर गेले हेाते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास आजी धुणे धूत असताना तिघेही नळकांडी पुलाच्या खाली खेळत होते. अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले व वाहून गेले. फुलंब्री ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी औरंगाबादहून अग्निशमन दलाला पाचारण केले. अभिजित व ऋषिकेश या दोन सख्ख्या भावांचे मृतदेह सापडले. शेजारी राहणाऱ्या अंकुशचा सायंकाळपर्यंत शोध सुरू होता.

सोनपेठ येथे नदीत बुडून बालकाचा झाला मृत्यू
सोनपेठ | सोनपेठ शहरातील फुकटपुरा भागात राहणारा शेख रेहान शेख आलीम (१२) हा ५ ऑक्टोबरला मित्रांसोबत दुपारी दीड वाजेच्या सुमारास वाण नदीच्या पात्रात पोहायला गेला व वाहून गेला. काही युवकांनी पात्रात उतरून त्याचा शोध घेतला. एक ते दीड तासानंतर रेहानचा मृतदेह एका बाभळीच्या बनात सापडला. सोनपेठ ठाण्याचे जमादार कुंडलिक वंजारे, वचिष्ठ भिसे, तलाठी चिकटे, नायब तहसीलदार गायकवाड तसेच असंख्य तरुणांनी मदत केली. सोनपेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

किनवटमध्ये विद्यार्थी डोहात बुडाला
नांदेड | किनवट शहरातील शांतिभूमी परिसरालगतच्या लोहमार्ग पुलाच्या पूर्वेकडील डोहात बुडून नववीतील जयराम संतोष तुप्पलवार (१५) हा बुडाला. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजता घडली. जयराम व विनायक (१७) हे दोघे भाऊ ५ ऑक्टोबरला नदीपात्रात अंघोळीसाठी गेले हेाते. जयरामला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो बुडाला. जयरामचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...