आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अस्मानी संकट:कोरोनानंतर आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर अवकळा, मुसळधार पावसामुळे पापरी परिसरातील द्राक्ष, केळीच्या बागा झाल्या भुईसपाट

पापरीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
मुसळधार पावसामुळे द्राक्ष आणि केळीच्या बागा भुईसपाट झाल्या. - Divya Marathi
मुसळधार पावसामुळे द्राक्ष आणि केळीच्या बागा भुईसपाट झाल्या.
  • पापरी परिसरात गारांसह मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

सम्मेद शहा

पापरी परिसरात आज (शनिवार 18 एप्रिल) दुपारी 4 ते 5 या वेळेत मेघगर्जना, सोसाटयाच्या वारा व गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे परिसरात द्राक्ष, केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत तर लिंबोनी, खरबूज, कलिंगड, आंबा आदी पिकांचेही नुकसान झाले आहे. सोबतच घरांचे पत्रे एंगल साठ्यासह उडून गेले. तेलंगवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचेही पत्रे उडून गेले. अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त फळबागाचा व घरांचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी उपसरपंच अजित भोसले यांनी केली आहे.

शनिवारी दुपारी साडेचार पासून सोसाट्याचा वारा सुटून मेघ गर्जने व विजांच्या कडकड़ाटासह पापरी परिसरात पावसास सुरुवात झाली. या पावसात शेंगदाना, चिंचोक्याच्या आकारा एवढ्या गाराही बरसत होत्या. या अवकाळी संकटात पाटील वस्तीकडील रवी भोसले यांची दीड एकर द्राक्ष बाग जमीन दोस्त झाली. येत्या काही दिवसात या बागेचा माल विक्रिस जाण्यास तयार होता. दीड एकर द्राक्ष बागेमधे 40 टन माल तयार झाला होता. तो सर्व जमीन दोस्त झाल्याने त्यांचे सुमारे 14 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. सुरेश गायकवाड, अजित भोसले यांच्याही द्राक्ष बागेच्या ओळी तारेचे व लोखंडी एंगलचे फाउंडेशन तूटून  उन्मळून गेल्या आहेत. सोमनाथ घागरे, दीपक शहा यांची केळी बाग ही भूईसपाट झाली असून 450-500 धुडे वाऱ्याने पिचकुन केळी घड़ासह पडली आहेत, पवन कुलकर्णी यांच्या लिंबोनी बागेतील कोवळी आलेली लिंबू फळे खाली पडून नुकसान झाले आहे. अनेक आंब्याच्या झाडांच्या कैऱ्या मोठ्या प्रमाणावर पडल्या आहेत. पापरी प्राथमिक शाळेच्या पाठीमागील झोपडपट्टी भागात सौदागर डोंगरे यांच्या घरावरचे पत्रे सीमेंट कुंभ उचकटुन लोखंडी एंगल साट्यासह उडून गेले. तेलंगवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोलीचेही पत्रे या वादळी वाऱ्यात उडून गेले असल्याची माहिती शिक्षक राम राऊत यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...