आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:बेरोजगार तरुणांना फसविणाऱ्या टोळीचा मास्टरमाईंड आंध्रप्रदेशातून वसमत पोलिसांच्या ताब्यात, अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील हजारो तरूणांना नोकरीचे अमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या टोळीचा मास्टर माईंड असलेल्या आरोपीला वसमत पोलिसांनी गुरुवारी ता. २४ रात्री आंध्रप्रदेशातील कर्नुल भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. शेलैशकुमार दुबे (रा. उत्तरप्रदेश) असे त्याचे नांव असून त्याच्याकडून आणखी महत्वाची माहिती मिळणार असूून अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशभरात बेरोजगारांना नोकरीचे अमिष दाखवून हजारो तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक झाली आहे. या प्रकरणाचे मोठे रॅकेट हिंगोलीच्या गुन्हे शाखा व वसमत पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी तीघे जण पोलिस कोठडीत आहेत.

दरम्यान, या आरोपींच्या चौकशीमध्ये उत्तरप्रदेशातील शैलैशकुमार दुबे हा मास्टर माईंड असल्याची कडी चौकशीत जुळली जात होती. त्यामुळे पोलिसांनी दुबेचा शोध सुरु केला होता. मागील चोविस पासून प्रभारी पोलिस निरीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, सायबर सेलचे जयप्रकाश झाडे, निलेश हलगे यांची पथके त्याची माहिती घेत होते.

दरम्यान, त्यासाठी पोलिसांनी उत्तरप्रदेशात माहिती घेण्यात सुरवात केली. मात्र तो आंध्रप्रदेशातील कर्नुल भागात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बरगे यांच्या पथकाने तातडीने कर्नुल गाठून त्या ठिकाणी मिळालेल्या ठिकाणावर छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. त्याला आज सकाळी वसमत येथे आणण्यात आले आहे.

या प्रकरणातील मास्टर माईंड पकडल्या गेल्यानंतर आता या प्रकरणात आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरु केली आहे. त्याने किती जणांची फसवणुक केली. फसवणुक प्रकरणातील टोळीमध्ये तो कितव्या क्रमांकावर आहे. आणखी काही आरोपी आहेत काय, तसेच बनावट शिक्के कुठे तयार केले, कागदपत्रे कशी तयार केली याची माहिती घेतली जात आहे.

पोलिसांच्या कामगिरीचे विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून कौतूक
देशभरात पाळेमुळे पसरलेल्या या रॅकेटची पाळेमुळे हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा व वसमत पोलिसांनी उघडकीस आणली आहेत. पोलिसांच्या या कामगिरी बद्दल नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्याच्या कार्याचेे कौतूक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...