आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • MC Election Updates: Ajit Pawar's Thread Manpa Ward Structure Will Be Two member To Stop BJP; News And Live Updates

महापालिका निवडणुकांचे पडघम:भाजपला रोखण्यासाठी मनपातील प्रभाग रचना दोन सदस्यीय करणार; अजित पवारांचे सूतोवाच

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत प्रभागाची हद्द बदलण्याची काँग्रेसची मागणी

पुढच्या वर्षी औरंगाबाद, मुंबईसह दहा महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन प्रभाग रचना बदलाचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केले. िद्वसदस्यीय प्रभाग रचना हवी, असे मत पवार यांनी मांडले. सन २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे भाजपला फायदा झाला होता. त्यामुळेच भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने मुंबई महापालिकेच्या प्रभागाच्या सीमा पूर्ववत कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोरोनामुळे औरंगाबाद, नवी मुंबई, ठाणे अशा दहा महानगरपालिकांच्या निवडणुका गतवर्षी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तिथे सध्या प्रशासकीय राजवट आहे. आता पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूकही नियोजित आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अन् प्रतिष्ठेची असून सन २०१७ मध्ये प्रभाग रचनेत बदल केल्यामुळे भाजपला फायदा झाल्याचे शिवसेना आणि काँग्रेसचे म्हणणे आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकांवेळी तत्कालीन फडणवीस सरकारने सध्याची चार सदस्यीय प्रभाग रचना केली होती. यामुळे विकासकामांना खीळ बसते अशी सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांची ओरड आहे. तसेच चार सदस्यीय प्रभाग रचनेचा लाभ मागच्या निवडणुका भाजपला झाला होता, असा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे.

त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. चार सदस्यीय प्रभाग रचनेच्या बदलामुळे राष्ट्रवादीची पुणे महापालिकेतील सत्ता गेली, असे राष्ट्रवादीचे नेते दावा करत आहेत. त्यामुळे प्रभाग रचनेतील बदलाच्या हालचाली लवकरच गतिमान होतील, अशी शक्यता आहे.

मुंबईत प्रभागाची हद्द बदलण्याची काँग्रेसची मागणी

  • फडणवीस सरकारने २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी २२७ पैकी ४५ प्रभागांच्या सीमा बदलल्या होत्या. त्या पूर्ववत करण्यात याव्यात, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
  • सन २०१७ मध्ये शिवसेना व भाजप स्वतंत्र लढले होते. प्रभागाच्या सीमा बदलाचा भाजपला लाभ झाला. भाजपच्या २९ जागा वाढून त्या ८२ वर पोहोचल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. शिवसेनेचे मुंबईत ९४ नगरसेवक आहेत आणि पालिकेत सेनेची सत्ता आहे.
  • फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपत आहे. राज्य निवडणूक आयोगाने पालिकेकडे मतदार याद्या व इतर तयारीसंदर्भात नुकतीच विचारणा केली आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने मुंबई महापालिकेच्या निवडणुका कोविडचे कारण देऊन पुढे ढकलू इच्छित आहे, असा आरोप भाजपने केला आहे.
बातम्या आणखी आहेत...