आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा विळखा:राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन दिली माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारण्यांभोवती कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच, महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्हआली असल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवर दिली.

काही दिवसांपूर्वीही बच्चू कडू हे आजारी होते. कोरोनासदृश्य लक्षणं असल्याने त्यावेळीही त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा त्यांचा कोरोनाबाबतचा अहवाल निगेटिव्ह आला होता. पण आता बच्चू कडू यांना कोरोनाने गाठले आहे. 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी', असे आवाहन त्यांनी केले आहे.