आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्ध्यातील आर्वी येथे कदम हॉस्पिटलमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. रुपाली चाकणकर यांनी वर्धा येथील जिल्हा पोलिस अधिक्षकांना पत्र लिहून याप्रकरणाचा खोलकर तपास व्हावा अशी मागणी केली आहे.
13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी संबंधित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच वर्ध्यातील सुप्रसिद्ध डॉक्टरांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वर्ध्याच्या घटनेने राज्यात तसेच वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील डॉक्टर ज्यांना अल्पवयीन मुलीचा गर्भपात केला आहे, त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चाकणकरांनी पत्रात काय म्हटले आहे
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीवर गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा केला असून, त्यांना अटक देखील केली आहे. पोलिसांनी अधिकचा तपास केला असता, रुग्णालयाच्या आवारात असलेल्या बायोगॅसच्या टाकीत पाच मृत अर्भकांच्या कवट्या आणि हाडांचे अवशेष सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब अतिशय धक्कादायक आणि डॉक्टरी पेशाला व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा खोलवर तपास करून यामध्ये आणखी काही धागेदोरे हाती लागतात का याचा तपास करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. तसेच भविष्यात अशा घटना घडूच नये यासाठी भरारी पथकाच्या माध्यमातून कार्यवाही करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या वतीने देण्यात आलेले आहेत. अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.
वर्धाच्या घटना नेमकी काय आहे
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ध्यातील आर्वी शहरात एका अल्पवयीन मुलाचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. सदरील प्रकरणातील मुलगा हा साडेसतरा वर्षातील आहे. तर मुलगी ही अवघ्या तेरा वर्षांची आहे. प्रेमसंबंध दरम्यान मुलीला गर्भधारणा झाली. या प्रकरण उघड होऊ नये म्हणून संबंधितांनी त्या मुलीचा गर्भपात करुन घेतला. शहरातील प्रसिद्ध डॉ. रेखा कदम यांनी मुलीचा गर्भपात केल्याची माहिती आहे. गर्भपातासाठी कदम यांनी 80000 रुपये फीस आकारली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.