आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रत्युत्तर:कला-स्पर्धा-अभिनयाला धर्माचा रंग देऊ नका; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे भाजपला प्रत्युत्तर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेच्या विभागप्रमुखाने अजान स्पर्धेचे आयोजन केले आहे

शिवसेनेच्या वतीने अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे. मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी सांगितले. शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपने जोरदार टीका केली. दरम्यान, या गोष्टीचे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समर्थन केले आहे. 'गीता पठणात मुस्लिम मुलीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिक्षण-कला-स्पर्धा-अभिनयाला धर्माचा रंग देऊ नका', असे प्रत्युत्तर मलिक यांनी दिले.

शिवसेनेने आयोजित केलेल्या अजान स्पर्धेवर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. सत्तेसाठी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व शिवसेना विसरत चालली आहे. शिवसेनेने आता फक्त हिरवा झेंडाच खांद्यावर घ्यायचा राहिला आहे, अशी खरमरीत टीका भाजपने केली. त्यावर बोलताना मलिक म्हणाले की, 'शिवसेनेने अजान स्पर्धेचे आयोजन केले आहे. भाजपकडून त्यावर आक्षेप घेण्यात येतो आहे. पण, बऱ्याच ठिकाणी गीता पठण कार्यक्रमामध्ये मुस्लिम मुलींनी पहिला क्रमांक पटकावल्याचे आपण पाहिले आहे. देशामध्ये कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणे अयोग्य आहे. दिलीप कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांनी सिनेमेमध्ये जे रोल केले आहेत किंवा मंदिरामध्ये सीन केले आहेत त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी धर्मांतर केले आहे. शिक्षण-कला-स्पर्धा-अभिनयाला धर्माचा रंग देऊ नका, असे मलिक म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser