आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नुकसान भरपाई:अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, आमदार बबनराव लोणीकरांची मागणी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांनी या हंगामात घेतलेली अनेक पिके अतिवृष्टीमुळे नष्ट झाली आहेत. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठवा अशी मागणी माजी मंत्री भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्राद्वारे विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाला आलेली फुले व पाते गळून पडले असून कापसाच्या उत्पादनावर त्याचा खूप मोठा परिणाम दिसून येणार आहे. तसेच, मूगाच्या शेंगा पूर्णपणे सरुन गेल्याने काही शेंगांना झाडावरच कोंब फुटलेले आहेत. हीच अवस्था उडीद, सोयाबीन, मका या पिकांची देखील झालेली आहे. परिणामी खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, अत्यल्प उत्पादन शेतकऱ्यांना होणार आहे असेही लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे.

हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत देणे आवश्यक असल्याचे मत लोणीकरांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षात असताना बांधावर जाऊन 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. आता ते सत्तेत आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी, असा सल्लाही बबनराव लोणीकरांनी शरद पवारांना यावेळी दिला. तसेच, येत्या अधिवेशनात 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचेही लोणीकर म्हणाले.

0