आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • MLA Raju Navghare । Vasmat । Politics On Shivaji Maharaj, Expel MLA Raju Navghare From The Party Nilesh Rane Challenges Deputy Chief Minister Ajit Pawar

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापले:हिम्मत असेल तर आमदार राजू नवघरेची पक्षातून हकालपट्टी करा, निलेश राणेंचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अश्वावर उभे राहून हार घातल्यावरून राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांच्या या कृत्यामुळे राजकारण हळू-हळू तापू लागले आहे. अश्वावर उभे राहून राजू नवघरे यांनी शिवाजी महाराजांना हार अर्पण केले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्य़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावरून विरोधकांनी राष्ट्रवादी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे.

भाजपचे नेते निलेश राणे यांनी याप्रकरणावरून राष्ट्रवादी पक्षावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राजू नवघरे यांना भर चौकात फटके टाकले पाहिजे. या पक्षात सारे औरंगजेबासारखे आहेत. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा." असे आव्हानही त्यांनी केल आहे.

समाज माध्यमात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार राजू नवघरे यांनी माध्यमांसमोर माफी मागितली त्यावेळी त्यांना रडू कोसळले. यावेळी ते म्हणाले की, 'मी एकट्यानेच पाप केले असेल तर मला फाशी द्या. अनेक जण माझ्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालण्यासाठी अश्वावर चढले होते. मग टीकेची झोड माझ्यावरच का? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला. 'माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा', अशी माफीही त्यांनी मागितली आहे. त्यानंतर सुद्धा विरोधक टीका करत आहे.

बातम्या आणखी आहेत...