आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे आमदार फुटू शकतात ही अपेक्षा नव्हती. त्यातही मुंबईतील आमदार फुटले याचे आश्चर्य वाटते. मात्र, आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. ते मुंबईत बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या बाहेर गेलेल शिवसैनिक हे परत येतील. ते पुन्हा आपल्या स्वत:च्या पक्षात कार्यरत राहतील, असा आमचा विश्वास आहे. या महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्याने आमचा त्यांना यापूर्वीही पाठिंबा होता आणि पुढेही राहणार असल्याचे स्पष्ट केले.
अजून मुख्यमंत्रिपद सोडलं नाही
जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेच्या अंतर्गत काय चाललंय हे आम्हाला माहिती नाही. पण काल मी, शरद पवार, सुप्रिया ताई यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना सर्व ती शक्य मदत करण्याची तयारी दर्शवली. हे सरकार शेवटपर्यंत टिकण्यास आम्ही तयार आहोत. वर्षा बंगल्यावर ते आधीही राहण्यास तयार नव्हते. ते फक्त प्रशासकीय सोयीसाठी ते तेथे राहत होते. वर्षा बंगला सोडला म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडलं नाही, ते आजही मुख्यमंत्री आहेत.
ते आमदार येतील
जयंत पाटील म्हणाले की, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर हे मुंबईतले आमदार आहेत. ते जाणार नाहीत असा आमचा विश्वास होता. पण काल उद्धवजींनी जे आवाजन केलं. त्यानंतर अजूनही सर्व आमदार परत येण्याची आशा आहे. कदाचित हे आमदार गेले असतील, तर त्यांना आणण्यासाठी किंवा तेथील परिस्थिती पाहण्यासाठी. सर्व आमदार जेव्हा उद्धवजींच्या समोर उभे राहतील. तेव्हा ते निश्चितच उद्धवजींचे नेतृत्व मान्य करतील.
बहुमत चाचणीची वेळ नाही
जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेचे आमदार फुटू शकतात, असं कोणाला वाटलं नव्हतं. त्यामुळे गृहखात्यालाही याची कल्पना आली नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांची आज 5 वाजता बैठक बोलवली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे. परिस्थितीमुळे विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवावी लागते. बहुमत चाचणीची वेळ अद्याप आलेली नाही, पण जेव्हा केव्हा तशी वेळ येईल आम्ही उद्धवजी ठाकरेंसोबत राहू.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.