आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे टीकास्त्र:रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरून फुशारकी मारणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादीकडे भीक मागत आहेत, मनसेचा शिवसेनेवर हल्ला

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन वर्षांपूर्वी शिवसेनेनं मुंबईत मनसेचे सहा नगरसेवक फोडले होते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये छोट्या-मोठ्या कारणांवरुन कुरबुरी सुरू आहेत. असे असताना राष्ट्रवादीनं अहमदनगरमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले. याचा शिवसेनेला मोठा धक्का बसला. आता मनसेने शिवसेनेवर हल्लाबोल केला. मनसे सरचिटणीस माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन, शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 'रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरुन सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादी काँग्रेसकडे भीक मागत आहेत. कालाय तसमें नम' असं  संदीप देशपांडे म्हणाले आहेत. 

तीन वर्षांपूर्वी शिवसेनेनं मुंबईत मनसेचे सहा नगरसेवक फोडले होते. त्याचा दाखला देत मनसेनं शिवसेनेवर हा हल्ला चढवला आहे. शिवसेनेने ऑक्टोबर 2017 मध्ये मुंबई महापालिकेतील मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडले होते. मुंबई महापालिकेत शिवसेनेने आपली सत्ता स्थिर राखण्यासाठी हा डाव रचला होता. त्यावेळी मनसेवर शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक असा टोलाही शिवसेनेकडून मारण्यात आला होता. मनसे नगरसेवकांनी फुटून शिवसेनेत प्रवेश केल्याने महापालिकेत शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ वाढले होते.

आता काहीशी तशीच परिस्थिती शिवसेनेवर पारनेरमध्ये ओढावली आहे. अजित पवार यांच्या खेळीमुळे शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचा संदर्भ देत मनसेनं शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय. 

नगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील कुरबुरी या वाढल्या आहेत. राज्यात एकत्र सत्तेत असताना आहेत. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षातील नगरसेवक फोडले जात असतील तर ते खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून व्यक्त केली जातेय. 

बातम्या आणखी आहेत...