आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना जनजागृती कॉलर ट्यून:बऱ्यापैकी जनजागृती झालीय, या कॉलरट्यूनमुळे महत्त्वाच्या फोनला विलंब होतोय, बाळा नांदगावकर वैतागले

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातभरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जनजागृतीसाठी सगळ्यांच्या मोबाईल फोनवर कॉलर ट्यून सुरू करण्यात आली. मात्र या कॉलर ट्यूनला प्रत्येकजण वैतागलेला दिसतोय. अनके राजकारणीही या कॉलर ट्यूनमुळे वैतागलेले आहे. अशात मनसेचे नेते बाळा नांदगावर यांनी कॉलर ट्यूनला वैतागून ती बंद करण्याची मागणी केली आहे.

सामान्य नागरिकही या कॉलर ट्यूनला अक्षरशः वैतागलेले आहेत. यामुळे ही कॉलरट्यून बंद करा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होताना दिसतेय. आता बाळा नांदगावकरांनीही याविरोधात आवाज उठवला आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनीही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी केली होती.

बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. 'कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोना ची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असलेतरी विलंब होतो अथवा लागत नाही, त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी.' अशी मागणी त्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...