आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमा कवच:खासगी डॉक्टरांना विमा कवच नाकारणे असंवेदनशील आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टरांच्या समस्या मांडण्यासाठी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे

राज्यातील डॉक्टरांच्या समस्या मांडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. 'खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना राज्य सरकार विमा कवच नाकारत आहे. हे अगदी असंवेदनशील आहे, असे मत राज ठाकरेंनी पत्राद्वारे व्यक्त केले आहे.

पत्रात राज ठाकरे पत्रात म्हणतात की, 'खासगी डॉक्टरांचे शिष्टमंडळ मला भेटायला आले होते. त्यांनी कोरोना काळातील त्यांचे कार्य मला सांगितले. त्यांचे कार्य खरच प्रशंसनीय आहे. पण, सरकारकडून होत असलेली त्यांची अनास्था मन विषण्ण करणारी आहे. कोरोना संसर्ग वाढल्यानंतर सरकारने सर्व खासगी डॉक्टर, खासगी लॅब आणि आरोग्य सेवा देणाऱ्यांना दवाखाने बंद न करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉक्टरांनी व्यवसायाशी बांधिलकी लक्षात घेऊन रुग्णसेवा सुरू ठेवली.'

'यादरम्यान सरकारने राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 लाखाचे विमा कवच देण्याचे परिपत्रक काढले. पण, आता खासगी डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबाला 50 लाखांच्या विम्याचा लाभ देण्याचे सरकार नाकारत आहे. हे डॉक्टर खासगी सेवेत होते म्हणून नाकारले जात असल्याचे कारण दिले जात आहे. हे विमा कवच केंद्राच्या योजनेप्रमाणे मिळत असताना, राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? याला असंवेदनशीलता नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? सरकार जर डॉक्टरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देणार असेल, मात्र त्याचवेळी स्वत:ची जबाबदारी विसरणार असेल तर हे चुकीचे आहे', असे राज ठाकरेंनी पत्रात म्हटले.