आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेत्यांना कोरोना:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण, लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यांच्या रिपोर्ट निगेटीव्ह

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित ठाकरे यांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील काही दिवस तिथेच त्यांच्यावर उपचार होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरेंना मागील काही दिवसांपासून सर्दी आणि ताप जाणवत होता. त्यांची काल चाचणी करण्यात आली असता, ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज दुपारी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या कुटुंबातील इतर कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत.

बातम्या आणखी आहेत...