आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेचे आंदोलन:वाढीव वीज बिलाविरोधात मनसेचा राज्यभर 'झटका मोर्चा', पोलिसांनी बळाचा वापर करत अनेक ठिकाणी आंदोलन चिरडले

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मनसैनिकांची धरपकड सुरू आहे

वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक पावित्रा घेत आज राज्यभरात 'झटका मोर्चा'चे आयोजन केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह अनेक ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याने मनसैनिकांची धरपकड सुरू झाली आहे.

'सरकार गंभीर असेल तर दखल घेईल, अन्यथा सरकारला मनसेच्या भाषेत इथून पुढे आंदोलन करण्यात येईल', असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तर, 'पोलिस आपले काम करतात. आम्ही आमचे काम करत आहोक, आम्ही आंबेडकर गार्डन येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ, त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री यांचे निवासस्थान, जर त्यांचे सरकार जनतेचे असेल तर ते मागणी मान्य करतील. अथवा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुढील भूमिका तयार आहे', अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

अनेक ठिकाणी आंदोलन चिरडलं

दरम्यान, औरंगाबाद शहरात मनसेचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी बळाचा वापर करुन आंदोलकांना ताब्यात घेतले. दुसरीकडे, ठाण्यातही मनसैनिकांची धरपकड सुरु झाली आहे. तर, पुण्यात पोलिसांनी मनसेचा मोर्चा रोखला आणि शेकडो मनसैनिकांना फरासखाना पोलिस ठाण्यात आणले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser