आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरूर:गायरान जमीन सोडा म्हणत धिंड काढून मुलाला मारहाण, सहा दिवसांनंतरही गुन्हा दाखल नाही; पोलिस म्हणतात, तक्रार नाही

शिरूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलाला खांबास बांधून मारहाण करण्यात आली. - Divya Marathi
मुलाला खांबास बांधून मारहाण करण्यात आली.
  • दुचाकी चोरली, मुलीची छेड काढल्याचा ग्रामस्थांनी केला 14 वर्षीय मुलावर आरोप

‘तुम्ही सरकारी गायरान जमिनीत का राहता’, असे म्हणत १४ वर्षांच्या मुलाची जमावाने चौकात धिंड काढून त्याला विजेच्या खांबास बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील पाडळी गावात १२ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता घडली. याप्रकरणी पीडित मुलाच्या मावशीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी अद्याप शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. पीडित व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबीयांनी शिरूर पोलिसांशी संपर्क केलेला नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रार दाखल केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान दुचाकी चोरून नेणे, मुलीची छेड काढणे असे आरोप ग्रामस्थांनी संबंधित मुलावर केले आहेत.

गायरान जमिनीतील रहिवासी शांताबाई लहु माळी यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार केली. यानुसार, पाडळी गाव शिवारातील गायरान जमिनीत अनेक वर्षांपासून काहीजण राहतात. या वस्तीवरील शांताबाई लहू माळी या त्यांच्या बहिणीचा मुलगा गोविंद बर्डे यास घेऊन दळणासाठी १२ ऑक्टोबरला पाडळी गावात गेल्या. त्या ठिकाणी अर्जुन इंगळे, शिवा अर्जुन इंगळे, सोनाजी जाधव, अशोक उर्फ नाना चव्हाण (फिटर) व इतर १६ जणांनी गायरान जमीन सोडून जा अशी धमकी देत मारहाण केली. यानंतर जमावाने गोंविदचे हात बांधून त्याची चौकात धिंड काढली. वेशीजवळील चौकात खांबास बांधून त्याला मारहाण केली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून मुलाची सुटका केली.

मुलाच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार तक्रार दाखल करू

शिरूर तालुक्यातील पाडळी प्रकरणात अद्याप कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही. पीडित व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबीयांनी शिरूर पोलिसांशी कसल्याही प्रकारचा संपर्क केलेला नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रार दाखल केली जाईल. सुरेश खाडे, पोलिस उपनिरीक्षक, शिरूर

चव्हाण (फिटर) व इतर १६ जणांनी गायरान जमीन सोडून जा अशी धमकी देत मारहाण केली. यानंतर जमावाने गोंविदचे हात बांधून त्याची चौकात धिंड काढली. वेशीजवळील चौकात खांबास बांधून त्याला मारहाण केली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून मुलाची सुटका केली.

दुचाकी चोरली, मुलीची छेड काढल्याचा ग्रामस्थांनी केला १४ वर्षीय मुलावर आरोप

> काही दिवसांपूर्वी पाडळी गावातील दुचाकी चोरीस गेल्या असून, या चोरीमागे हेच लोक असल्याचा गावातील काही लोकांना संशय आहे.

> या चोरीच्या संशयातूनच या मुलास मारहाण झाल्याची चर्चा आहे.

> मारहाण झालेल्या युवकाने गावातील मुलीची छेड काढली होती, त्यामुळे गावातील युवकांनी त्यास चोप दिला असा आरोप आता ग्रामस्थ करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...