आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Modi Government's New Policy Completely Loses Central Control Over The Economy Prithviraj Chavan; News And Live Updates

सांगली:मोदी सरकारच्या नव्या धोरणामुळे अर्थव्यस्थेवरील केंद्राचे नियंत्रण पूर्णपणे सुटले - पृथ्वीराज चव्हाण

सांगलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जनतेसाठी 21 लाख कोटींचे पॅकजे द्यावे

माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा ते चंद्रशेखर यांच्या पंतप्रधानपदाच्या अस्थिर राजकीय काळात भारतीय अर्थ व्यवस्था कोलमडली गेली होती. परंतु काँग्रेसने डॉ.मनमोहनसिंग यांच्याकडे अर्थव्यवस्थेची सूत्रे दिल्यानंतर अवघ्या दोन तीन वर्षाच्या काळातच ती सावरली होती. आता केंद्रातील मोदी सरकारच्या नव्या अर्थ धोरणामुळे अर्थ व्यस्थेवरील केंद्र सरकारचे नियंत्रण पूर्णपणे सुटलेले आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीती सोमवारी केला.

देशातील अर्थव्यवस्था दोलायमान झाली असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हिंदुत्व काश्मिर प्रश्न लव-जिहाद सीएए कायदा आदी गोष्टी पुढे करून जनतेची दिशाभूल करत आहेत. सध्या कोरोनाने संपूर्ण देशाला विळखा घातला असताना केंद्र सरकार हा प्रश्‍न हाताळण्यात पूर्णत: अपयशी ठरली आहे. विकसित नव्हे तर विकसनशील देशांनी सुध्दा भारताच्या कोरोना धोरणाबाबत कडाडून टीका केली आहे, असा दावाही चव्हाण यांनी केला.

जनतेसाठी २१ लाख कोटींचे पॅकजे द्यावे
अपुरी वैद्यकीय साधने आणि सेवा याचा पर्दाफाश झाला आहे. रोजगारही मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. बेरोजगारांची संख्या आता कोट्यावधी झाली आहे. परंतु सर्वसामान्य जनतेला आपले जीवनमान सहजपणे जगता यावे यासाठी केंद्र शासनाने तातडीने २१ लाख कोटींचे पॅकेज जाहीर करून त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली.

बातम्या आणखी आहेत...