आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Money Laundering Case: Ex Maharashtra Home Minister Anil Deshmukh Arrested By ED After Over 12 Hours Of Questioning News And Updates

अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगात:माजी गृहमंत्र्यांना 6 नोव्हेंबर्यंत ईडी कोठडी; घरच्या जेवणासह चौकशीदरम्यान वकिलांच्या हजेरीला मिळाली परवानगी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

100 कोटी वसुली प्रकरणातील आरोपी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी ईडीच्या कोठडीत साजरी होणार आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे. सुमारे 13 तासांच्या चौकशीनंतर रात्री उशिरा देशमुख यांना अटक करण्यात आली.

कोठडीत घरचे जेवण देण्याची आणि चौकशीदरम्यान त्यांच्या वकिलाला सोबत ठेवण्याची देशमुख यांची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. अनेक दिवस बेपत्ता झाल्यानंतर सोमवारी सकाळी 11:55 वाजता अचानक अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात पोहोचले.

पाच वेळा समन्स, याचिका फेटाळल्यावर हजर

परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीसंदर्भात आरोप केल्यानंतर ईडीमार्फत चौकशी सुरू झाली. मात्र अनिल देशमुख आणि कुटुंबीय अनेक महिन्यांपासून अज्ञातवासात होते. ईडीने देशमुख यांच्या निवासस्थानी पाच वेळा धाडी टाकल्या होत्या. त्यांच्या नागपूर, मुंबई आणि वर्धा येथील घरी ईडीने छापेमारी करत कारवाई केली होती. देशमुख यांना कार्यालयात हजर राहण्याबाबत ईडीने अनेकदा समन्स बजावले, परंतु ईडीसमोर हजर न राहता देशमुखांनी वकिलांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका शुक्रवारी फेटाळली गेली होती.

खंडणीप्रकरणी सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात

बिल्डर विमल अग्रवालकडून खंडणी वसुलीप्रकरणी चौकशी करण्यासाठी सोमवारी बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात वाझे, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीसिंगसह आणखी 4 आरोपी आहेत.

माझ्यावर आरोप करणारे परमबीरसिंग कुठे आहेत?

अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर झाले. त्यापूर्वी त्यांनी आपली भूमिका चित्रफितीद्वारे मांडली. त्यात ते म्हणतात, परमबीरसिंग भारत सोडून पळून गेल्याच्या बातम्या आहेत. माझ्यावर आरोप करणारी व्यक्तीच पळून गेली आहे. परमबीर यांच्याविरुद्ध पोलिस खात्यातील अनेकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. सचिन वाझे याने परमबीरसिंगच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. मी गृहमंत्री असताना त्याला नोकरीतून काढण्याची प्रक्रिया सुरू केली त्यामुळे त्याने माझ्यावर आरोप केले. परमबीर यांच्यासारख्या लोकांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप होत आहेत. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात असून याचे मला दुःख आहे, अशी खंत देशमुख यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...