आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँड्रिंग:जॅकलिन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या तिसऱ्या समन्सवरही हजर झाली नाही, 18 ऑक्टोबरला पुन्हा बोलावले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला चौथ्यांदा मनी लाँड्रिंग प्रकरणात बोलावले आहे. एजन्सीने शनिवारी दुपारी 11 वाजता जॅकलिनला दिल्लीतील कार्यालयात बोलावले होते, पण ती आली नाही. आता तीला पुन्हा सोमवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. हे प्रकरण सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी नीला पॉल मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे.

अहवालानुसार, तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना जॅकलीनचा सामना आरोपी जोडप्याशी करायचा आहे. फोर्टिस हेल्थकेअरचे प्रवर्तक शिविंदर सिंग यांच्या कुटुंबाला सुमारे 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल चंद्रशेखर आणि पॉल यांना आधीच अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...