आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मान्सूस अपडेट:मान्सून तळकोकणात दाखल, सोलापूरपर्यंत धडकला; दोन दिवसांत महाराष्ट्र व्यापणार

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादेत पूर्वमोसमी, मराठवाड्यात अतिवृष्टी
  • कुलाबा वेधशाळेनुसार, राज्यात 15 जूनपर्यंत सर्वत्र मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता

नैऋत्य मोसमी पाऊस गुरुवारी तळकोकणात दाखल झाला.मान्सूनने गुरुवारी (११ जून) कोकणातील हर्णे ते मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत मजल मारली आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. कुलाबा वेधशाळेने मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा सुस्तावली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत मान्सूनने वेगाने प्रगती करत गुरुवारी महाराष्ट्रात प्रवेश केला. येत्या दोन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी अनुकूल हवामान असल्याचे कुलाबा वेधशाळेने म्हटले आहे.

औरंगाबादेत पूर्वमोसमी, मराठवाड्यात अतिवृष्टी

मराठवाड्यात बुधवारी रात्रीपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. परभणी येथे १९० मिमी, पालम ९० मिमी, भूम, मानवत, पाथरी, कळमनुरी येथे ७० मिमीची नोंद झाली. गुरुवारी रात्री औरंगाबाद शहरासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत जोरदार पूर्वमोसमी पाऊस झाला.

औरंगाबाद, जालनासाठी आॅरेंज अलर्ट :

कुलाबा वेधशाळेनुसार, राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे.

ऑरेंज अलर्ट  : कोकणातील सर्व जिल्हे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ६४.५ ते २०० मिमी पावसाची शक्यता.

यलो अलर्ट : उस्मानाबाद, बीड, सोलापूर, नगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, लातूर, नांदेड जिल्ह्यांत १५.५ ते ६४ मिमीपर्यंत पावसाची शक्यता.

बातम्या आणखी आहेत...