आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार आज गुरूवार 5 जानेवारी असून, पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी....
भारत-श्रीलंका आज दुसरा टी-20 सामना
भारत-श्रीलंका यांच्यात दुसरा टी-20 मालिकेतील दुसरा आज पुण्यात होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आज मालिका विजयासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. दरम्यान, गंभीर दुखापतीमुळे संजु सॅमसनला विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी अमरावतीच्या यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माची निवड करण्यात आली. यातून तो आता आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण करणार आहे. वाचा सविस्तर
राज्यात तापमानाचा पारा घसरला
राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. अनेक ठिकाणी 10 ते 15 अंश सेल्सिअस तापमानची नोंद झाली. यासह 8 ते 11 जानेवारी दरम्यान राज्याच्या विविध भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. वाचा सविस्तर
ऋषभ पंतच्या गुडघ्याचे होणार ऑपरेशन
रस्ता अपघातात जखमी झालेला क्रिकेटपटू ऋषभ पंतला डेहराडूनहून मुंबईला विमानाने हलवण्यात आले. त्याच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. पंतच्या गुडघ्याच्या लिगामेंटची शस्त्रक्रिया होणार आहे. तसेच रुग्णालयाचे स्पोर्ट्स मेडिसिन एंड ऑर्थोस्कोपी विभागाचे प्रमुख डॉ. दिनशॉ परडीवाला यांच्या देखरेखीखाली पंतवर उपचार केले जाणार असल्याची माहिती BCCI ने दिली आहे. वाचा सविस्तर
'शिवशक्ती-भीमशक्ती'ची घोषणा
बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीने युती जाहीर केलीये. या निमित्ताने आता शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे. राज्याला धाडसी मुख्यमंत्री लाभला आहे, असे म्हणत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी युती केल्याचे जाहीर केले आहे. तर लोकांना न्याय देण्यासाठी एकत्र आलो, मुख्यमंत्री आपला माणूस असल्याची भावना सगळ्यांमध्ये आहे त्यामुळे एकत्र येत काम करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. वाचा सविस्तर
धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. यात त्यांच्या छातीला मार लागला असून छातीमध्ये 2 ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्यांना एअरलिफ्टद्वारे मुंबईत हलवले आहे. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.