आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीच्या ट्रकने मोटारसायकल स्वारास उडवले, भीषण अपघातात मायलेकाचा मृत्यू तर वडील गंभीर जखमी

खामगावएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलfस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या ग्राम बोरजवळा नजीक उमरा फाट्यावर आज ट्रक व मोटारसायकलच्या भीषण अपघातात मायलेक ठार झाले तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी 8 वाजता  घडली. यामध्ये राजू शामराव मिरटकर (रा. मोताळा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर, त्यांची पत्नी विमलबाई राजू मिरटकर (वय 28) व मुलगा रोशन मिरटकर (वय6) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात एवढा भीषण होता की मायलेक जागीच ठार झाले, तर वडील गंभीर जखमी झाले. अपघातात मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच उमरा येथील पोलिस पाटील किशोर अंभोरे यांनी पिंपळगाव राजाचे ठाणेदार सचिन चव्हाण यांना घटनेची विस्तृत माहिती दिली असता ठाणेदार चव्हाण यांनी कुठलीही तमा न बाळगता गावातील व्यक्तीच्या मोटारसायकलवर बसून घटनास्थळ गाठले. या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी निर्माण झाल्याने कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीची दखल घेत ठाणेदार चव्हाण व सहकारी पोलिस कर्मचार्यांनी गर्दी पांगवली व मृतक मायलेकाचे प्रेत शासकीय रुग्णवाहिके द्वारे खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविले.

अपघात खामगाव-मोताळा या राज्यमार्गावरील उमरा-बोरजवळा या फाट्यावर घडला. अपघाताची वास्तवता एवढी भीषण होती की मायलेक हे जागीच ठार झाले, त्यामुळे मोताळा येथील मिरटकर या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या भीषण अपघाताला कारणीभूत असलेला सार्वजनिक वितरण प्रणालीच्या (एमएच-31 सीबी-6755) ट्रकचा चालक शेख गणी शेख हुसेन हा निष्काळजी पणाने हा ट्रक चालवत असतांना (एम एच 29 झेड 5541) या दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली त्यामुळे या ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मिरटकर कुटुंबाने पोलिसांकडे केली आहे.

एकीकडे शासन गोरगरिबांना धान्य पोचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना या वाहनाच्या चालकाच्या निष्काळजी पणाने आज मायलेकांचा जीव घेतल्याने परिसरातील नागरिकांनी खदखद व्यक्त करीत या ट्रक चालक आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे स्थानिक पोलिस ठाण्यात ट्रक चालक आरोपी शेख गणी शेख हुसेन (रा. पिंपळगाव राजा गुलजारपुरा) यास तात्काळ अटक करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच दुपारी त्याची खामगाव येथील न्यायालयात रवानगी केली.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील हजर झाल्याने त्यांनी परिस्थिती चा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन चव्हाण यांनी घटनेचा मागोवा घेत या प्रकरणी दोषी ट्रक चालकांवर कठोर कारवाई केली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक योगेश धोत्रे, पोकॉ संदीप डाबेराव, विजय पढार, संतोष डागोर, विनोद भोजने, विजय मिरगे यांनी घटनास्थळी सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...