आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्महत्या:दोन लेकरांसह विहिरीत ऊडी घेऊन मातेची आत्महत्या

जाफराबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे बुधवारी रात्री घडला प्रकार

जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील एक 28 वर्षीय महिलेने आपल्या दोन वर्षांचा मुलगा आणि सात वर्षाची मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देळेगव्हाण शिवारात सुधाकर बनकर शेतातच पत्र्याचे शेड करून राहत होते. पत्नी ,एक मुलगा व  एक मुलगी असे चारजण राहत होते. दरम्यान बुधवारी रात्री सर्वजण घरात झोपले असताना रात्रीच रखमाबाई सुधाकर बनकर (वय 28) हिने मुलगी प्रणिती सुधाकर बनकर (वय 7 वर्ष )व मुलगा शंभो  सुधाकर बनकर (दीड वर्ष) या दोन चिमुकल्यांना घेऊन शेतातील राहत्या घरालगत असलेल्या विहिरीत उडी घेतली. ही बाब गुरुवारी (ता.11)सकाळी निदर्शनास आली आत्महत्येमागील नेमके कारण समजले नसले तरी याबाबत पोलिसांनी सकाळी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह विहिरीतून काढण्यासाठी गावकऱ्यांची मदत घेतली. दरम्यान विहिरीचे बांधकाम झाले नसल्याने मृतदेह काढण्यासाठी अडचण निर्माण झाली होती.

बातम्या आणखी आहेत...