आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत मविआची खलबते:काँग्रेसचे 35 आमदार सोनियांच्या दरबारात, स्वपक्षाचेच मंत्री आमदारांना वेळ व निधी देण्यात कमी पडत असल्याची केली तक्रार, समन्वयक नसल्याचीही व्यक्त केली खंत

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसमधील आमदारांनी आपली नाराजी थेट दिल्ली दरबारी व्यक्त केलीय. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि महाराष्ट्रातील 35 आमदारांची राजधानी दिल्लीत जवळपास 35 मिनिटे बैठक झाली. यात काँग्रेस आमदारांनी राज्यात काँग्रेस आमदारांना समन्वयक नाही, अशी तक्रार सोनिया गांधीकडे केली आहे.

राज्यात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अजित पवार निधी देतात. आणि त्यांच आमदारांना समन्वय घडवून आणतात. तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांना वेळ देतात. मात्र काँग्रेसचे कोणतेच मंत्री आमदारांना वेळ देत नाही. केवळ आपल्या मतदारसंघात निधी नेतात. काँग्रेस आमदारांना निधी मिळावा यासाठी प्रयत्न करत नाही, अशी तक्रार काँग्रेसच्या 35 आमदारांनी सोनिया गांधींकडे केली आहे.

राऊतांच्या घरी सेना खासदारांची बैठक

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. आणि यानंतर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. संजय राऊत यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेनेचे विनायक राऊत, गजानन किर्तीकर, अरविंद सावंत, श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

पवारांचे मविआच्या आमदारांना स्नेहभोजन

राज्यात दिवसभर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आता दिल्लीत राजकीय खलबत सुरू झाली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मविआच्या सर्व आमदारांना स्नेहभोजनाला बोलावले आहे. तर दुसरीकडे रावसाहेब दानवेंनी भाजपच्या आमदारांना स्नेहभोजनासाठी निमंत्रण दिले आहे. संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईवरनंतर शरद पवार मविआच्या नेत्यांशी काय चर्चा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी संजय राऊतांनी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करत शिवसेनेच्या खासदारांशी चर्चा केली आहे.

सोनियांपुढे राज्यातील स्थितीचे कथन

गेली अनेक दिवस काँग्रेसचे आमदार मविआत नाराज असल्याचा चर्चा सुरू होत्या. या नाराज आमदारांच्या गटाने देखील काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील मंत्रीच वेळ देत नसल्याचा या आमदारांचा आरोप होता. तर मतदारसंघासाठी विकासनिधी मिळत नाही, तो देण्यात यावा अशा अनेक मागण्या घेऊन काँग्रेसचे आमदार सोनिया गांधी यांना भेटले आहेत. यावेळी पक्ष वाढीसाठी चर्चा करण्यात आली असे आमदारांनी सांगितले. तर राज्यातील काँग्रेसच्या परिस्थितीबाबत सोनिया गांधींना सांगितले असेही नाराज आमदारांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...