आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठी बातमी:'मी पाहतो तू महाराष्ट्रात कशी फिरते, तुलाही जेलमध्ये टाकू'; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची नवनीत राणा यांना धमकी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवनीत राणा यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार

संसदेत सोमवारी सचिन वाझे प्रकरणाचा मुद्दा उचलणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी धमकी दिल्याचे समोर आले आहे. नवनीत राणा यांनी याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार दिली आहे. ओम बिर्ला यांना दिलेल्या पत्रात नवनीत राणा म्हणतात की, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी 'तू महाराष्ट्रात कशी येते ते पाहतो. तुलाही तुरुंगात टाकेन', अशी धमकी दिली आहे.

नवनीत राणा यांनी पत्रात लिहीले आहे की, 'महाराष्ट्रात गाजत असलेल्या मनसुख हीरेन हत्याकांड, सचिन वाझे आणि माजी पोलिस आयुक्तांनी लिहीलेल्या पत्रामुळे ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या प्रश्नानांना मी संसदेत मांडले. यामुळेच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीमध्ये असताना मला धमकी दिली. यापूर्वीही शिवसेनेच्या लेटर हेडवरुन आणि फोनवरुन अॅसिड फेकण्याची धमकी देण्यात आली आहे.' नवनीत राणा यांनी याप्रकरणी पोलिस कारवाईची मागणी केली आहे.

अरविंद सावंत यांच्याकडून आरोपांचे खंडन

नवनीत राणा यांच्या आरोपानंतर मुंबई दक्षिणचे खासदार अरविंद सावंत यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले की, त्या महिला आहेत आणि शिवसेनावाले कधीच महिलांना धमकी देत नाहीत.

काय आहे प्रकरण ?

संसदेत अँटीलिया प्रकरणावर बोलताना खासदार नवनीत रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर सचिन वाझेंची पाठराखण करण्याचा आरोप लावला. त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेंना पोलिस सेवेत परत घेण्याची मागणी केली होती. 16 वर्षांपासून निलंबित असलेल्या व्यक्तीला परत घेण्याची मागणी उद्धव ठाकरे कशामुळे करत होते. त्यांना याचे खरे कारण सांगावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...