आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा विळखा:'आपल्या प्रार्थनांमुळे मी मृत्यूच्या दारातून परत आले'; नवनीत राणा यांनी रुग्णालयातून शेअर केला व्हिडिओ

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज नवनीर राणा यांच्याबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. त्यांना आज अतिदक्षता विभागातून सामान्य कक्षात हलवण्यात आले आहे. याबाबत स्वतः नवनीत राणा यांनी व्हिडिओ शेअर करुन माहिती दिली.

यादरम्यान नवनीत राणा म्हणाल्या की, ' मला आयसीयूतून सामान्य कक्षात हलवण्यात आले आहे. माझी प्रकृती थोडी स्थिर आहे. आपल्या प्रार्थनांमुळे मी मृत्यूच्या दारातून परत आले. गेले पाच-सहा दिवस मी अमरावती-नागपूर-मुंबई असा प्रवास केला. आपण चिंता करु नका. माझी लहान मुलंसुद्धा काळजी करत आहेत, त्यांनाही मी हा व्हिडीओ पाठवत आहे. मी आणखी चांगली कामे करावी म्हणून देवाने मला पुन्हा संधी दिली. मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार,' अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली.

नवनीत कौर राणा यांना 6 ऑगस्टला कोरोनाची लागण झाल्याने समोर आले. नवनीत राणा यांच्यासह पती- आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील 12 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अमरावतीतील घरीच उपचार करण्यात आले. परंतू, नंतर त्रास वाढल्याने त्यांच्यावर नागपुरातील वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु झाले. मात्र, प्रकृती अजून खालावल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...