आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:खासदार सातव यांच्यावर कळमनुरीत सोमवारी सकाळी 10 वाजता होणार अंत्यसंस्कार, सकाळी सहा वाजल्यापासून अंत्यदर्शन

हिंगोली (मंगेश शेवाळकर)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील 23 दिवसांपासून पुणे येथे कोरोनावर उपचार घेणाऱ्या खासदार सातव यांनी कोरोनावर मात केली होती.

काँग्रेसचे खासदार अॅड. राजीव सातव यांच्यावर कळमनुरी येथील त्याच्या निवासस्थाना समोरील शेतात सोमवारी ता. 17 सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पुर्वी सकाळी सहा वाजल्या पासून त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

मागील 23 दिवसांपासून पुणे येथे कोरोनावर उपचार घेणाऱ्या खासदार सातव यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर त्यांची प्रकृती बरी होऊन ते लवकरच हिंगोली जिल्ह्यात दाखल होतील असा विश्‍वास हिंगोलीकरांना होता. मात्र नियतीने आपला डाव साधला अन कोरोना नंतर झालेल्या काही गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले.

त्यांचा मृतदेह आज सकाळी पुणे येथून रुग्णवाहिकेद्वारे कळमनुरीकडे आणला जात आहे. सायंकाळी उशीरा त्यांचा मृतदेह कळमनुरी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर सोमवारी ता. 17 सकाळी सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे. त्यानंतर दहा वाजता अंत्यसंस्कार केले जातील.

खासदार राजू सातव यांचे पार्थिव घेऊन निघालेली रुग्णवाहिका
खासदार राजू सातव यांचे पार्थिव घेऊन निघालेली रुग्णवाहिका

खासदार राजीव सातव यांचे पार्थिव घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेवर ठिकाणी फुले वाहून कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली.

दरम्यान, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. या शिवाय शहरी भागा सोबतच ग्रामीण भागातून सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, पत्रकार नंदकिशोर तोष्णीवाल कळमनुरी येथे ठाण मांडून आहेत.

शहरातील अग्रसेन चौक येथे खासदार राजीव सातव यांचे पार्थिव आले. यावेळी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे , आमदार संतोष बांगर, माजी आमदार रामराव वडकुते, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, यांच्या सह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

30 पोलिस अधिकारी व दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात
कळमनुरी येथे खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी ता. १७ सकाळी दहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे. सर्वांनी मास्क घालून व सामाजिक अंतर ठेवूनच खासदार सातव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घ्यावे हीच त्यांना खरी श्रद्धांजली राहील असेही जयवंशी यांनी स्पष्ट केले. तर अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस विभागाने ही मोठी तयारी केली असून जिल्हाभरातील 30 पोलिस अधिकारी व दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

बातम्या आणखी आहेत...