आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती उद्या घेणार राष्ट्रपतींची भेट, राज्यातील सर्वपक्षीय प्रतिनिधींचे शिष्टमंडळ देखील सोबत राहणार

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन केले होते.

मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती हे उद्या, दि. 2 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.

या भेटीकरिता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन केले होते. संभाजीराजेंच्या या आवाहनास प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातून शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व कॉंग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत.

छत्रपती संभाजीराजे हे सुरूवातीपासून मराठा आरक्षण लढ्यात सक्रीय असून रस्त्यावरील आंदोलनांपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत सर्व स्तरांवर ते प्रयत्नशील राहिले आहेत. खासदार संभाजीराजे मराठा आरक्षण मुद्द्यावर गेल्या वर्षभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेट घेण्यासाठी निवेदन दिले. मात्र एवढे प्रयत्न करुन देखील त्यांना पंतप्रधानांची भेट घेता आली नाही. मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची वेळ आता त्यांना मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...