आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पष्टीकरण:'कोरोना काळात डॉक्टर देवदूतासारखे काम करत आहेत, माझ्याकडून त्यांचा आपमान झाला नाही'- संजय राऊत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ,कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून काही डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही ,

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात डॉक्टर्ससंबंधात केलेल्या वक्तव्यानंतर मार्ड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'कोरोना काळात डॉक्टर देवदूतासारखे काम करत आहेत, माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही,' असे राऊत यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटना आता राजकीय संघटना झाली असल्याचे म्हणत, कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात असे उत्तर त्यांनी दिले. संजय राऊतांनी एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना 'मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही, कंपाऊंडरकडून घेतो. त्याला जास्त कळतं', असे विधान केले होते.

राऊत पुढे म्हणाले की, 'कोरोना काळात शिवसेनेच्या अनेक लोकांनी डॉक्टरांविरोधात आंदोलन केले, तेव्हा त्यांची मी समजूत काढली. अनेकदा मी डॉक्टरांच्या बाजूने उभे राहिलो आहे. मार्डच्या अनेक संप आणि मागण्यांबाबत मी भक्कमपणे बाजू मांडली आहे. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही. काही विशिष्ट पक्षांची लोक डॉक्टरांना हाती घेऊन मोहीम चालवत आहेत. शिवाय कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून काही डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही, ' असेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...