आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व धर्म हा तर गांडूळ विचार:खासदार, आमदार देशासाठी कलंक; संभाजी भिडे यांची जहरी टीका; आक्षेपार्ह शब्दांचा केला वापर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आमदार आणि खासदार देशासाठी कलंक असल्याचे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 35 वर्षांपासून सांगलीत दुर्गामाता दौडीचे आयोजन केले जाते. या दौडीचा समारोप विजयादशमी निमित्त झाला, यावेळी ते बोलत होते.

राजकारणावर टीका करताना यावेळी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी हे देशाला लागलेले कलंक असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर सर्वधर्म हा गांडूळ विचार असल्याचे देखील ते म्हणाले. हा विचार सत्य नसून असत्य विचार आहे. हा विचार आपल्या इतिहासाला धरून नाही. आपल्या मातृभूमीसाठी जगणारी माणसे पाहिजे मात्र, इथे त्याचीच बोंब असल्याचे देखील त्यांनी सांगितलं.

'लोक ज्यांना निवडून देतात ते आमदार काय आणि खासदार काय किंवा लोकप्रतिनिधी काय या सर्वांना लाज वाटत नाही. सगळेजण पगार घेतात भाडोत्री आहेत. हे आपल्या लोकशाहीला आणि परंपरेला कलंक आहेत. अशा शब्दात भिडे गुरुजी यांनी लोकप्रतिनिधींवर टीका केली.

हजारो धारकऱ्यांचा सहभाग
नवरात्रीच्या काळात शिवप्रतिष्ठांच्या वतीने दुर्गा माता दौडीचे आयोजन करण्यात येते. या दौडीमध्ये हजारो धारकरी सहभागी होतात. या दुर्गामाता दौडेची सांगता दसरा म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी केली जाते. मागील 35 वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे या परंपरेत खंड पडला होता मात्र, यंदा ही दौड उत्साहात संपन्न झाली.

अनेकदा वादग्रस्त वक्तव्य
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी यापूर्वी देखील अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण देखील ढवळून निघाले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा वादही झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...