आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धा:खासदारांनी उचलला दगड; पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल ; सोशल मीडियावर व्हिडीओ  व्हायरल

वर्धाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देवळी येथील खाजगी जागेवर नगर पालिकेच्या आशिर्वादाने घरे बांधण्यात आली असून,नळ जोडणीचे काम करण्यासाठी पाईप लाईन खोदकाम सुरू असतानाच जागेच्या मालकाने विरोध दर्शविला असता, खासदारांनी कुठल्याही प्रकारची मध्यस्ती न करता त्यांच्यावर दगड उचलत मारण्याचा प्रयत्न केला असता,खासदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळी येथील अशोक काकडे यांचे वार्ड क्रमांक ५ येथे ०.५८ हेक्टर जमीन आहेत.या जमिनीवर नगर पालिकेकडून अतिक्रमण धारकांना ईमलाकर पावती देत घरे बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. त्या जागेवर पाणी मिळत नसल्यामुळे तेथील नागरिकांनी खासदार रामदास तडस यांना पाणी होत नसल्याची माहिती दिली होती. खासदार तडस यांच्या पुढाकाराने जल प्राधिकरण अंतर्गत नळ योजनेच्या कामाला सुरुवात करीत असते वेळेस जागेचे मालक अशोक काकडे यांनी खाजगी जागेवर शासकीय काम करण्याचा विरोध दर्शविला असता,खासदार रामदास तडस यांनी कुठल्याही प्रकारची मध्यस्ती न करता अशोक काकडे यांच्यावर शेकडो नागरिकांच्या समक्ष दगड उचलून मारण्याचा प्रयत्न केला असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून,अशोक काकडे यांच्या तक्रारी वरुन खासदार रामदास तडस यांच्या विरुध्द देवळी पोलीस स्टेशनमध्ये २९४,३३६,५०४,५०६ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळी येथील झुडपी जागेवर ४५ नागरिकांची वस्ती आहेत,त्या नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे नळ जोडणीचे कामाचा शुभारंभ सुरु असतांनाच अशोक काकडे याने काम थांबविण्याचा प्रयत्न केला होता.सोबतच खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करीत असून,शासकीय कामात अडथळा निर्माण केला असल्यामुळे देवळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.- रामदास तडस

माझ्या मालकीच्या जागेवरून नगर पालिकेने कुठल्याही प्रकारची सूचना न देता नळ जोडणीचे काम सुरु केले होते. या आधी रीतसर तक्रार नोंदवली होती.तरी सुद्धा नगर पालिकेने माझ्या जागेवरून खोदकाम सुरू केले असल्यामुळे मी काम थांबविण्याचा प्रयत्न केला असता,खासदार रामदास तडस यांनी मला मारण्याची धमकी देत माझ्यावर दगड उचलला होता.या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. -अशोक काकडे

बातम्या आणखी आहेत...