आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवारी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना आता होमगार्ड दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. परमबीर सिंह यांचे पद जाणार, अशी चर्चा मागील तीन ते चार दिवसांपासून सुरू होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील आपले मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत होते. सूत्रांनी सांगितल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या सांगण्यावरुन मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंह यांना हटवण्यास मंजुरी दिली आहे.
किरीट सोमैया म्हणाले- आम्ही वझे गँगवर कारवाईची मागणी करतो
परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैया यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की,'परमबीर सिंह यांची बदल करुन सरकार सचिन वाझे, मनसुख हिरेन आणि अँटीलिया प्रकरणातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहे. आम्ही ठाकरे सरकारकडे संपूर्ण वाझे गँगवर कारईची मागणी करतो.
या कारणांमुळे झाली परमबीर सिंह यांची बदली
परमबीर यांना'अंडरवर्ल्ड स्पेशलिस्ट' म्हटले जाते
1988 बॅचचे आयपीएस अधिकारी परमबीर सिंह, संजय बर्वे यांच्या जागेवर आयोक्त बनवण्यात आले होते. यापूर्वी ते भ्रष्टाचारविरोधी ब्यूरो (एसीबी) चे महासंचालक होते. परमबीर यांना 'अंडरवर्ल्ड स्पेशलिस्ट' म्हटले जाते.
माळेगाव ब्लास्ट प्रकरणामुळे मिळाली लोकप्रियता
परमबीर सिंह माळेगाव ब्लास्टदरम्यान भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा ठाकुर यांच्या अटकेनंतर चर्चेत आले होते. त्यावेळेस परमबीर यांच्याकडेच बॉम्ब ब्लास्टचा तपास होता. परंतु, हेमंत करकरे तेव्हा एटीएस चीफ होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.