आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • 'Mukhya Mantri Kisan Yojana' Will Also Be Started In The State On The Lines Of The Central Government | Marathi News

लवकरच निर्णय घेण्याची शक्यता:केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ सुरू होणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे समजते. योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.सरकार शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणार आहे. मात्र, ते कशा पद्धतीने देणार याबाबत स्पष्टता नाही. या योजनेसाठी किती शेतकरी पात्र ठरतील याबाबत अद्याप माहिती नाही. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३, ५०१ कोटी जिल्ह्यांना सुपूर्द जून ते ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल, असे सांगितले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून मिळून ३ ५०१ कोटी निधी जिल्ह्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली असून मदत व पुनर्वसन विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे. वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी १३६०० प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...