आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai Doctor Couple Take Medicines From Patients Who Have Recovered From The Corona And Give Them To The Poor For Free

औषधांचे रॉबिनहुड:कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांकडून औषधे घेऊन गरिबांना मोफत देतात

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 दिवसांत जमा केला 20 किलो औषधांचा स्टॉक

कोरोना संक्रमणामध्ये अचानक झालेल्या वाढीमुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ऑक्सीजन, औषधे आणि खाटांची कमतरता भासत आहे. मुंबईमध्ये कोरोनाची औषधे खरेदी करण्यासाठी मेडिकल दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेकांना ही महाग औषधे घेणे परवडत नाही. अशा लोकांना दिलासा देण्याचे काम मुंबईतील एक दांपत्य करत आहे.

मुंबईतील डॉक्टर मार्कस रैने आणि त्यांची पत्नी डॉ. रैना कोरोनातुन ठीक झालेल्या रुग्णांकडून त्यांची औषधे घेऊन गरिबांना मोफत देण्याचे काम करत आहेत. कफ परेड परिसरात राहणाऱ्या या दांपत्याने 10 दिवसांत 20 किलो औषधांचा स्टॉक जमा केला आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना देणार औषधं

या दांपत्याने जमा केलेली सर्व औषधे दशातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिली जाणार आहेत. रैने दांपत्याच्या या प्रयत्नांचे सोशल मीडियावर खुप कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर त्यांना औषधांचे रॉबिनहुड म्हटले जात आहे.

100 पेक्षा जास्त घरांमधून औषधं जमा केली

महाराष्ट्र दिन म्हणजेच 1 मे रोजी रैने दांपत्याने या अभियानाची सुरुवात केली होती. त्यांनी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त घरीन जाऊन होम क्वारंटाइनमध्ये राहत असलेल्या नागरिकांकडून ही औषधे जमा केली आहेत.

मेड्स फॉर मोर ठेवले अभियानाचे नाव
डॉ. रैने म्हणाले की, देशात अनेक ठिकाणी औषधांची कमतरता भासत आहे. अनेकांना औषधं मिळण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत औषधांना खराब होऊ देणे, योग्य नाही. या औषधांना ग्रामीण भागातील लोकांना देता येईल. या अभियानाचे नाव‘मेड्स (मेडिसिन) फॉर मोर’ ठेवले आहेत.

आतापर्यंत जमा केली कोरोनाची अनेक औषधं
डॉ. रैनेने पुढे सांगितले की, ठीक झालेल्या रुग्णांकडून डॉक्टरांनी प्रिसक्राइब केलेल्या फेबिफ्लू, अँटीबायोटिक, इनहेलर आणि विटामिनची औषधे जमा केली जात आहेत. याशिवाय, पल्स ऑक्सीमीटर आणि थर्मोमीटरदेखील घेतले जात आहे. प्रत्येक औषध घेण्यापूर्वी त्याची एक्सपायरी टेड पाहिली जात आहे. आतापर्यंत आम्ही 20 किलोपेक्षा जास्त स्टॉक जमा केला आहे.

पहिली कंसाइनमेंट गुजरातच्या एका आदिवासी भागात जाणार

डॉ. रैनेने सांगितले की, औषधांचे कंसाइनमेंट तयार असून, गुजरातच्या एका आदिवासी भागात पाठवली जाईल. सध्या आमची प्राथमिकता गुजरात आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी आहे. पुढे आम्ही याला अजून वाढवू.

सोशल मीडियाद्वारे केली मदतीची अपील
या अभियानातील एक सदस्य रूची कोठारी म्हणाल्या की, हे अभियान फक्त मुंबईपुरते नाही. अभियानासोबत तुम्हाला येता येईल. medsformoreindia@gmail.com किंवा इंस्टाग्रामवर @medsformore.पेजवर संपर्क करू शकता.

बातम्या आणखी आहेत...