आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्स पार्टी प्रकरण:नवाब मलिकांच्या सवलांना एनसीबीने दिले उत्तर, म्हणाले- त्यांना खासगी तपासनीस म्हणून रेडमध्ये सामील केले होते

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक प्रकरणी राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केलेल्या सवालांचे अंमली पदार्थ विरोधी पथक अर्थात NCB उत्तर दिले आहे. मलिकांच्या आरोपानंतर NCB ला पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यांनी मलिक यांचे आरोप तथ्यहिन असल्याचे सांगितले. पण, मनीष भानुशाली आणि किरण गोसावी हे साक्षीदार असल्याचा दावाच एनसीबीने केला आहे.

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर एनसीबीचे अधिकारी माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सांगितले की त्यांनी नियमांनुसार सर्व कारवाई केली आहे. प्रत्येकाला नियमानुसार पकडण्यात आले आहे. एनसीबीला त्याच्या छाप्यात खासगी तपासनीसांचा समावेश करण्याचा अधिकार आहे. म्हणूनच त्यांनी या तपासणीत केपी गोसावी आणि भानुशालीसह 9 जणांचा समावेश केला, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नवाब मलिक यांचा काय आहे आरोप?

'आर्यन खानची अटक ही बनावट आहे. गेल्या एक महिन्यापासून याबद्दल पत्रकारांना माहिती प्रसारित केली जात होती की पुढील लक्ष्य अभिनेता शाहरुख खान आहे, असं नवाब मलिक म्हणाले. तसेच 'जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत टक्कल असलेला एक व्यक्ती आर्यन खानला घेऊन जात आहे. आणि याच व्यक्तीसोबत आर्यन खानचा एक सेल्फी फोटो आहे. त्यानंतर एनआयएनं दिल्लीतल्या एका अधिकाऱ्याच्या माहितीच्या आधारावर माहिती दिली की, NCB नं सांगितलं की हा व्यक्ती आमचा अधिकारी नाही. अरबाज मर्चंटचा देखील एक व्हिडिओ एनआयएनं रिलीज केला. यात लाल शर्ट घातलेली व्यक्ती दिसत आहे. हे दोन्ही व्हिडिओ एनआयएने रिलीज केलेत. या व्हिडिओत पहिला व्यक्ती के. पी. गोसावी आणि दुसरा व्यक्ती मनीष भानुशाली आहे, असंही मलिक यांनी सांगितले.

हा व्यक्ती भाजपचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा शेलार यांच्यासोबत फोटो आहेत. त्यामुळे मलिकांनी काही सवाल उपस्थित केलेत. एनसीबी आणि भाजपचे काय संबंध आहेत हे एनसीबीनं सिद्ध करावे, असे आव्हानच मलिकांनी केले होते.

बातम्या आणखी आहेत...