आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai In The Lead, Nanded District In Last Place; Only 7.92 Percent Vaccinations Are Complete In The State | Marathi News

बूस्टर डोस:मुंबई आघाडीवर, नांदेड जिल्हा अंतिम स्थानावर ; राज्यात केवळ 7.92 टक्के लस पूर्ण

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणातील बूस्टर डोसच्या मोहिमेत मुंबई जिल्हा आघाडीवर आहे. सर्वाधिक १२.१५ टक्के लसीकरण मुंबईमध्ये तर सर्वात कमी लसीकरण झाल्याने नांदेड जिल्हा शेवटच्या स्थानावर आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वय वर्षे १८ ते ५९ या वयोगटातील लाभार्थींसाठी १५ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत शासकीय लसीकरण केंद्रावरून मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी आतापर्यंत राज्यात पात्र लाभार्थींपैकी केवळ ७.९२ टक्के बूस्टर डोस पूर्ण झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १,७०,७७३ बूस्टर डोस देण्यात आले.

राज्यातील स्थिती { बूस्टर डोससाठी पात्र लाभार्थी : ७ कोटी ५६ लाख ६०० { लस घेतलेले : ५९ लाख ९१,१८४ { राज्याची टक्केवारी : ७.९२ नांदेड जिल्हा शेवटच्या स्थानी : बुस्टर डोसमध्ये नांदेड जिल्हा शेवटच्या ३५ व्या स्थानी आहे. त्यापूर्वी बुलडाणा, गडचिरोली, यवतमाळ, जालना, परभणी, हिंगोली, वाशीम जिल्हे आहेत.

बातम्या आणखी आहेत...