आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:'निरपराध आणि स्वाभिमानी लोकांच्या राहण्यासाठी मुंबई शहर सुरक्षित नाही'- अमृता फडणवीस

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तिढा अजून वाढताना दिसतोय. याप्रकरणी मुंभई-बिहार पोलिस आमने सामने आल्यानंतर अनेक नेत्यांनी याप्रकरणात उडी घेतली आहे. यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी तपासावरुन टीका केली आहे. मुंबईने माणुसकी गमावली, निरपराध आणि स्वाभिमानी लोकांच्या राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नसल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे.

अमृता फडणवीस यांनी लिहिले की, "ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळले जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. "

पाटण्याचे एसपी क्वारेंटाइन

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी रविवारी मुंबईत आलेले पाटणाचे एसपी विनय तिवारी यांना बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)ने क्वारेंटाइन करण्यात आले. त्यांच्या हातावर क्वारेंटाइनचा शिक्का मारुन पुढील आदेशापर्यंत एका घरात राहण्यात सांगितले आहे. ते यापुढे तपासणीसाठी कोणालाही भेटू शकणार नाहीत.

याप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेते राम कदम, किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तपास यंत्रणेवर टीका केली. त्यातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही वक्तव्य करुन या प्रकरणात उडी घेतली आहे.

बिहार निवडणुकीसाठी सुशांतच्या आत्महत्येवरुन राजकारण केले जात आहे- रोहित पवार

सुशांत आत्महत्या प्रकरणात भाजप राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. बिहारमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा वेगळ्या अर्थाने पेटवला जात असल्याचे ही रोहित म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्र सरकार कुणालाही घाबरत नाही. शासकीय व्यक्ती महाराष्ट्रात येते. त्या ठिकाणी शासन-शासन यामध्ये प्रोटोकॉल पाळला जावा असे वाटते. मात्र सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या खोलात जावे लागले. यासाठी मुंबई पोलिस सक्षम आहेत. ते नक्कीच या प्रकरणाचा छडा लावतील.