आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai । Kalyan Station Accident । Pregnant Woman Fell In Platform Gap While Trying To Get Off Moving Train Angel Rpf Constable Saved Her Life

कल्याण स्टेशनवर अंगावर काटा आणणारी घटना:गर्भवती महिला ट्रेनखाली जाणार इतक्यात RPF च्या जवानाने धाव घेत वाचवले महिलेचे जीव; पाहा कल्याण स्थानकावरील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील कल्याण स्टेशनवर एका आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे एका गर्भवती महिलेला जीवदान मिळाले आहे. जवानाने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ही महिला चालत्या रेल्वेमधून उतरण्याचा प्रयत्न करत होती. त्यादरम्यान महिला प्लेटफार्मवर पडली व ट्रेनखाली जाणार लगेगच ड्यूटीवर तैनात असलेल्या आरपीएफच्या जवानाने धाव घेत महिलेचा जीव वाचला आहे. ही संपुर्ण स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. चंद्रेश नावाचा एक व्यक्ती आपल्या लहान मुलांसह आठ महिन्याच्या गर्भवती महिलेसोबत चुकीच्या ट्रेनमध्ये बसला होता. त्याला 02103 या रेल्वेगाडीने गोरखपुरला जायचे होते. चुकीच्या रेल्वेगाडीत बसल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आपण दुसऱ्या गाडीत बसलो आहे. त्यानंतर त्याने उतरण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यादरम्यानच ही घटना घडली आहे. चंद्रेश हा आपला लहान मुलासोबत रेल्वेतून खाली उतरला, त्यानंतर त्याने आपल्या बायकोला उतरण्याचा प्रयत्न केला.

त्यादरम्यान सदरील महिलेचा तोल गेल्याने ती खाली पडली. त्याच दरम्यान स्थानकावर कार्यरत असलेल्या आरपीएफच्या एस.आर. खांडेकर या जवानाने सदरील महिलेचे प्राण वाचवले आहे. सदरील घटनेतील महिलेला कोणत्याही प्रकारे दुखापत झालेली नाही. व तिचे बाळ देखील सुरक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...