आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासी मजुरांमध्ये पुन्हा लॉकडाउनची भीती:मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर प्रचंड गर्दी; लॉकडाऊनच्या भीतीने हजारोंच्या संख्येने गावाकडे जात आहेत लोक

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही वाढणारी गर्दी पाहून रेल्वे विभागाने ट्रेनची संख्या वाढली आहे

मागील काही दिवसांपासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. पण, पुन्हा पुर्वीप्रमाणे कडक लॉकडाऊन लागेल, या भीतीने मुंबईत काम करणारे इतर राज्यातील प्रवासी मजुर आपल्या गावाची वाट धरत आहेत. गावाकडे जाणाऱ्या मजुरांची प्रचंड संख्येने गर्दी सध्या रेल्वे स्टेशनवर दिसत आहे. भिवंडी, ठाण्यासारख्या परिसरातून मोठ्या संख्येने मजुरांचे पलायन सुरू आहे. मागच्या वर्षी अचानक लागलेल्या लॉकडाऊनमुळे जो त्रास सहन करावा लागला, तो त्रास पुन्हा सहन करावा लागू नये, यामुळे हे मजुर आताच आपल्या गावाकडे निघत आहेत.

अचानक लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने घराकडे पलायन

मुंबईच्या लोकमान्य तिळक टर्मिनस स्टेशनवर रविवारपासून दररोज प्रवासी मजुरांची गर्दी वाढताना दिसत आहे. लोक आपले सामान आणि कुटुंबासह स्टेशवर जमा होत आहेत. स्टेशनवर रिजर्वेशनशिवाय प्रवेश मिळत नाहीये, यामुळे तिकीट खिडकींवर मजुरांची प्रचंड गर्दी जमत आहे.

लॉकडाउन लागण्याच्या भीतीने नोकरीवरुन काढले जात आहे
उत्तर प्रदेशातील बांदाचे रहिवासी असलेले राजेश परिहार मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून सिक्योरिटी गार्डचे काम करतात. लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने कंपनीने एका आठवड्यापूर्वी त्यांना कामावरुन काढून टाकले. मुंबईत राहण्यासाठी पैसे नसल्यामुळे आता ते आपल्या गावाकडे जात आहेत.

या उद्योगांवर होईल लॉकडाऊनचा परिणाम

मजुरांच्या पलायनामुळे पावरलूम इंडस्ट्रीसह त्या संबंधित साइजिंग, डाइंग कंपन्या, मोती कारखाने आणि गोदामांची कामे, कंस्ट्रक्शन आणि इतर अनेक उद्योगांवर परिणाम होऊ शकतो. राज्य सरकारकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2020 च्या लॉकडाऊनमध्ये मुंबईसह संपूर्ण राज्यातून से 11.86 लाख प्रवासी मजुरांनी पलायन केले होते.

कुठून येतात मजुर

'इकोनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेश आणि बिहारवरुन हे मजुर मुंबई आणि दिल्लीला सर्वाधिक जातात. यानंतर, मध्य प्रदेश, ओडिशा आणि झारखंडचे मजुर येतात.

बातम्या आणखी आहेत...