आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai Lockdown; UP Bihar Migrant Workers LTT Station Update | Dainik Bhaskar Ground Report From Lokmanya Tilak Terminus Railway Station

मुंबईच्या स्टेशनवर प्रवासी मजुरांचे हाल:गावाकडे जाण्याची आस लावून बसलेल्या लोकांकडे खायलाही पैसा नाही; 3-3 दिवसांपासून स्टेशनवर बसलेत

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गर्दी होत असल्यामुळे पोलिसही लाठ्या मारत आहेत

राजेश गाबा

'इस सफर में नींद ऐसी खो गई, हम न सोये, रात थक कर सो गई...' राही मासूम रजा यांच्या या ओळी मुंबईमधील लोकमान्य टिळक टर्मिनसवर ट्रेनची वाट पाहत बसलेल्या प्रवासी मजुरांची दशा व्यक्त करते...

कोरोनाची दुसरी लाट आणि लॉकडाउनदरम्यान घरी जाण्यासाठी मजबूर झालेल्या लोकांना परत एकदा त्रासाचा सामना करावा लागत आहे. दिवसभर त्यांच्या परिस्थिती सांगणारे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. पण, रात्री त्यांना कोणत्या त्रासाचा सामना करावा लागतो, हे कुणालाच माहित नाही. पण, त्यांची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी आमचे रिपोर्टर त्या प्रवासी मजुरांकडे गेले. त्यांच्यासोबत रात्री 9 ते सकाळी 9 पर्यंत वेळ घालवला, त्यांचे म्हणणे जाणून घेतले. तुम्हीही वाचा 12 तासातील असहायतेच्या 6 कथा...

पहली कथा: आधीच लॉकडाउनमुळे मजुर गोंधळात, स्टेशनवर पोलिसही लाठ्या मारताहेत

रात्री 8:45 वाजता मुंबईमध्ये कलम-144 लागू झाली होती. आम्ही टॅक्सीमधून प्रभादेवीवरुन 9:00 वाजता LTT कडे आलोत. स्टेशनबाहेर यूपी-बिहारचे हजारो लोक दिसत होते. कोणी बसले होते, कोणी झोपले होते. त्यांची कुणी स्कॅनिंग करत नव्हते आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालनही होत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, घरी पोहचू का नाही ? हा प्रश्न अनेकांना यामुळे पडला होता, कारण अनेकांकडे तिकीट नव्हते. बिहारचे पप्पू इलेक्ट्रिशयन सांगतात की, "मी कुटुंबासोबत स्टेशनकडे निघालो होतो, मध्येच समजले लॉकडाऊन लागला. यावेळी विचार आला की, बिहारला जावे का परत नालासोपारामध्ये जावे.'

दुसरी कथा: मालकाने पुर्ण पैसे दिले नाही, आता घरी कसे जाणार...

रात्री 10 वाजता बिहारला जाणाऱ्या धीरज कुमारशी बातचीत झाली. ते एका टाइल्स मार्बलचे मिस्त्री आहेत. त्यांनी सांगितले, "लॉकडाउनमुळे आता गावाकडे जात आहोत. काम पूर्ण केले, पण मालकाने पूर्ण पैसे दिले नाही. मागच्या वेळेसही आम्ही दोन महिने मुंबईत अडकलो होतो. गावाकडून पैसे मागवावे लागले होते. गावाकडे जाऊनही मजुरी केली आणि उधारी फेडली. आता परत तीच चिंता आहे, पैसे नाही, तिकीट नाही. घरी कसं जाऊ...'

तिसरी कथा: लॉकडाउनमुळे त्रास होतो, आता गावाकडे शेती करणार

पप्पू सहानीला गोरखपुरला जायचे आहे. ते मुंबईत भंगाराचा व्यवसाय करायचे. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी काम सुरू केले होते. लॉकडाऊनमुळे अजून त्रास होईळ, त्यामुळेच गावाकडे जात आहे. आता यापुढे गावाकडे जाऊन शेती करण्याचं पक्कं केलं आहे.

चौथी कथा: टॉयलेटपर्यंत लोकांना पळवले, अनेकजण उपाशीपोटी वाट पाहू लागले

रात्री 11 वाजता आम्ही पाहिले की, स्टेशनवरील टॉयलेटपासूनही लोकांना हकलले जात होते. पुरुष स्टेशनबाहेर उघड्यावर कुठेही जाऊ शकतात, पण महिलांसाठी त्रास जास्त होता. बाथरुमला जावं लागू नये, म्हणून अनेकांनी पाणी पिले नाही. तर, अनेकांकडे पाणी विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते.

पाचवी कथा: मालक पैसेही देत नाही आणि खायलाही देत नाही

रात्री एक वाजता आमची काही मुलांवर नजर गेली. ते म्हणाले, मालकाने पैसे दिले नाही. घरी जाण्यापुरते पैसे आहेत, पण तिकीट मिळाली नाही. मालकाने कामही बंद केले. काही वेळापुर्वी दोन साहेब आले होते, त्यांनी युपी-बिहारला जाण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. आम्ही कुठून देणार एवढे पैसे, आमच्याकडेच नाहीत.

सहावी कथा: गावाकडून मुले म्हणतात, पप्पा कोणतीही गाडी पकडून घरी या

टाटा नगरला जाणारे जहांगीर मुंबईत शिलाईचे काम करतात. त्यांच्यासोबत अजून चारजण आहेत. मोठ्या मेहनतीने जनरलचे तिकीट मिळाले. आमची रात्री बारा वाजता ट्रेन आहे, पण आम्हाला स्टेशनमध्ये जाऊ दिले जात नाही. मागच्या लॉकडाऊनमध्येही आम्ही अडकलो होतो.

बातम्या आणखी आहेत...