आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या ट्रेनमध्ये गँगरेप:लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये 20 वर्षीय महिलेवर बलात्कार, 4 नराधमांना अटक; प्रवाशांनाही लुटले

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये एका 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शनिवारी चार आरोपींना अटक करण्यात आली. तसेच आणखी चार आरोपींचा शोध सुरू आहे. महिला आपल्या पतीसोबत प्रवास करत होती.

मुंबई जीआरपीचे आयुक्त कैसर खालिद के यांनी सांगितले की, इगतपुरीहून पुष्पक एक्स्प्रेसमध्ये 8 गुंड चढले होते, त्यांनी आधी धावत्या ट्रेनवर दरोडा घातला आणि नंतर एका महिलेवर बलात्कार केला. ही घटना शुक्रवारी रात्री घडल्याचे सांगितले जात आहे.

या संदर्भात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी औरंगाबाद रेल्वे जिल्ह्यात येणाऱ्या इगतपुरी येथून स्लीपर बोगी कोच क्रमांक डी-2 मध्ये चढले होते. त्यांनी इगतपुरी ते कल्याण दरम्यान ही घटना घडवली होती.

15 ते 20 प्रवाशांनाही लुटले
आरोपींनी 15 ते 20 प्रवाशांनाही लुटले. त्यांनी प्रवाशांकडून रोख रक्कम, मोबाईल आणि मौल्यवान वस्तू हिसकावल्या. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आयपीसी आणि भारतीय रेल्वे कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...