आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवाळी बोनस:मुंबई महापालिकेची कामगारांना मोठी दिवाळी भेट; 15 हजार 500 रुपये बोनसची महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून घोषणा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीला अवघे काही दिवस बाकी असताना मुंबई महापालिकेने कामगारांसाठी मोठी भेट देऊन दिवाळी गोड केली आहे. मुंबईचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी कामगारांना 15 हजार 500 रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे. कोरोना संकटामुळे कामगारांच्या बोनसमध्ये गेल्यावर्षीपेक्षा फक्त 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

कामगार संघटनांनी 20 हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली होती. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करत हा तिढा सोडवला आणि आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन कामगारांचा बोनस जाहीर केला. यानुसार पालिका कामगारांना 15 हजार 500, अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 7750, शिक्षण खात्यात मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 4700 आणि अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 2350 रुपये बोनस देण्यात येणार आहे. शिवाय सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 4400 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा किशोरी पेडणेकर यांनी केली.