आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

निधन वार्ता:महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन, वयाच्या 71 वर्षी घेतला अखेरचा श्वास 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त व लोकप्रिय लेखिका नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. त्या 71 वर्षांच्या होत्या.

सत्यनारायण या 1972 च्या बॅचच्या (आता निवृत्त) सनदी अधिकारी असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. याशिवाय त्या मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे 150 कविता लिहिल्या आहेत. तर काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला. त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते. नीला सत्यनारायण यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1949 रोजी मुंबईत झाला होता.