आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत 1400 कोटींचे म्याऊ म्याऊ ड्रग्ज जप्त:माहितीच्या आधारे औषधी निर्मिती युनिटवर छापा, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरळी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नालासोपारा परिसरातील औषधी निर्मिती युनिटवर छापा टाकून 1,400 कोटी रुपये किमतीचे 700 किलो पेक्षा जास्त मेफेड्रोन जप्त केले आहे. बाजारात हे ड्रग्ज म्याऊ म्याऊ या नावाने ओळखले जाते. पालघर जिल्ह्यात असलेल्या युनिटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा जप्त झाल्याने यात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती अंमली पदर्थ विरोधी सेलचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी चार आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तर नालासोपारा येथून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. अलीकडच्या काळात अंमली पदार्थांबाबत शहर पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्यानुसार मेफेड्रोनवर बंदी आहे.

आधीही नवी मुंबईत 362 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

यापूर्वी 15 जुलै रोजी नवी मुंबईतील गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. नवी मुंबई गुन्हे शाखेने कोट्यवधींचे हेरॉईन जप्त केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत 362.5 कोटी एवढी आहे. ड्रग्जची खेप असलेला हा कंटेनर दुबईहून नवी मुंबईच्या न्हावाशेवा या बंदरात आणला होता. हा कंटेनर नवकार लॉजिस्टिकच्या पनवेलजवळील अजिवली गावातील असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. जप्त करण्यात आलेली हेरॉईनची खेप हा आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट नेटवर्कच्या पुरवठा साखळीचा भाग असल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केले होते.

बातम्या आणखी आहेत...