आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बसला अपघात:मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बसला कंटेनरची धडक, बस चालकाचा जागीच मृत्यू

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनरने बसला धडक दिली. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर 10 प्रवासी जखमी झाले. बस पुण्याहून मुंबईकडे जात असताना खोपोली कॅम्पसमधील बोरघाट परिसरात एका कंटेनरने बसला मागून धडक दिली. बसमधील 35 प्रवाशांपैकी 10 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा अपघात खोपोली जवळ झाला असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या 6 प्रवाशांना नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे या मार्गावर वाहतुक कोंडी झाली आहे. या अपघातात बसची मागील बाजू पूर्ण फुटली आहे. कंटेनरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या अपघातासंदर्भात प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही बस सिंधुदुर्गामध्ये लग्नासाठी गेली होती. लग्नावरुन परत येत असताना हा अपघात झाला आहे. ही बस वाशिंदला जात होती. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी यंत्रणा घटनास्थळी दाखल असून मदतकार्य सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...