आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचे थैमान:चिपळूणमधील कोविड रुग्णालयात शिरले पुराचे पाणी; ऑक्सिजनअभावी 8 रुग्णांचा मृत्यू, शहरातील सर्वच सेवा विस्कळीत

रत्नागिरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा कहर सुरु आहे. यामुळे अनेक जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून मृतांच्या आकड्यातदेखील वाढ होत आहे. सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पाणीच पाणी साचले आहे. यामुळे बस, रेल्वे, विमान आणि इतर अनेक बाबींवर परिणाम झाला आहे.

तर दुसरीकडे चिपळूणमध्ये पुराचे पाणी एका कोविड रुग्णालयात शिरल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील अपरांत रुग्णालयात घडली आहे. पुराचे पाणी रुग्णालयात शिरल्याने वीजपुरवठा पुर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यावेळी रुग्णालयात 21 लोक उपचार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरातील सर्वच सेवा विस्कळीत
चिपळूण शहरात गुरुवारी पहाटेपासून पाणी जमा होण्यास सुरुवात झाली. यामुळे संपूर्ण शहरात पाणीच पाणी झाले अनेक भाग पाण्याखाली आहेत. सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मोबाईल नेटवर्क, वीज पुरवठा ठप्प झाले आहे. त्यामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यात आतापर्यंत पावसामुळे 50 च्या वर लोक मरण पावले आहे.

बातम्या आणखी आहेत...