आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai Weekend Lockdown News: Maharashtra Update | Dadar, Matunga, Andheri, Grant Road, Worli, Kurla, Bhendi Bazaar

लॉकडाऊनमुळे मुंबई थांबली:वीकेंड लॉकडाऊनमुळे मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट, कोरोनाच्या भीतीने लोकल ट्रेन आणि बस रिकाम्याच...

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वीकेंड लॉकडाऊनमध्ये रस्त्यांवर फक्त पोलिस दिसत आहेत

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत दर शुक्रवारी आणि शनिवारी असेल. या लॉकडाऊनमुळे 24 तास धावणाऱ्या मुंबईला ब्रेक लावले आहे. लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर आणि समुद्र किनाऱ्यावर चितपाखरुही दिसेना. सर्वत्र फक्त पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसत आहे.

मुंबईतील कुर्ला इस्ट परिसरात बाहेर आलेल्या लोकांना विचारपूस करताना पोलिस
मुंबईतील कुर्ला इस्ट परिसरात बाहेर आलेल्या लोकांना विचारपूस करताना पोलिस
मुंबईतील अनेक लोकल ट्रेन रिकामी आहेत
मुंबईतील अनेक लोकल ट्रेन रिकामी आहेत

लोकल, बस, टॅक्सीदेखील रिकाम्या

लॉकडाउनमध्येही पब्लिक ट्रांसपोर्ट म्हणजे ट्रेन, बेस्ट बस, ऑटो, काळी-पिवळी टॅक्सी सुरू आहेत. पण, यात एक-दोन लोकच दिसत आहेत. मुंहईटी लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनमध्येही तुरळक प्रवासी दिसत आहेत.

मुंबईत रस्त्यांवर बस धावत आहे, पण त्यात प्रवासी नाहीत
मुंबईत रस्त्यांवर बस धावत आहे, पण त्यात प्रवासी नाहीत

मुंबईतील गर्दी असलेल्या परिसरात शुकशूकाट

सरकारची कठोर पाऊले आणि कोरोनाच्या भीतीने मुंबईतील नेहमी गर्दी असलेल्या दादर, माटुंगा, अंधेरी, ग्रांट रोड, वर्ली, कुर्ला, भिंडी बाजार, घाटकोपर आणि मशीद बंदरसारख्या परिसरातही तुरळक लोक दिसत आहेत. या परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांकडून दंड वसुली केली जात आहे.

मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरातही शांतता
मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरातही शांतता
बातम्या आणखी आहेत...