आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:बेळगावावत आज महापालिकेची निवडणूक, तब्बल 8 वर्षांनी होत आहे मतदान; 4 लाखांपेक्षा जास्त मतदार बजावणार हक्क

बेळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 लाख मतदार बजावणार हक्क

बेळगाव महानगरपालिकेसाठी आज मतदान होत आहे. तब्बल आठ वर्षानंतर येथे मतदान होतेय. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण कर्नाटक राज्याच आणि पश्चिम महाराष्ट्राच लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे. एकूण 58 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी तब्बल 358 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस देखील रिंगणात उतरले आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे देखील तगडे आव्हान असणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून 21 अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार आहे. मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण बेळगाव शहरात कडेकोट पोलिस बंदोपस्त तैनात आहे.

4 लाख मतदार बजावणार हक्क
बेळगाव येथील महापालिका निवडणुकीमध्ये जवळपास 4 लाखांपेक्षा जास्त मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान निवडणुकीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेतली आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या धोक्यामुळे प्रचारादरम्यान देखील अनेक गोष्टींची काळजी घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या होत्या

एकूण 58 जागांसाठी ही निवडणूक होतेय. यासाठी तब्बल 358 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विशेष म्हणजे यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसह सर्वपक्षीय उमेदवार आपापल्या पक्षीय चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...