आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्घृण खून:दारू का पाजत नाही म्हणून डोक्यात दगड घालून खून, 60 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात घातला दगड

हदगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“दारू का पाजत नाहीस?’ असे म्हणत ६० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून करण्यात अाल्याचा प्रकार हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे घडला. आरोपीविरुद्ध मनाठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. भीमराव तुकाराम जमदाडे (६०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

बरडशेवाळा येथील बायपास पुलाच्या रस्त्याजवळ भीमराव सोमाजी जमदाडेने (४५) भीमराव यांना रस्त्यात अडवले. “मला दारू का पाजत नाहीस?’ अशी विचारणा करत त्यांच्याशी आधी वाद घातला व नंतर शिवीगाळ केली. नंतर एकदमच त्यांना बायपास पुलाच्या रस्त्यालगत असलेल्या नाल्यांमध्ये ढकलून त्यांच्या डोक्यात मोठा दगड घातला. यात भीमराव यांचा जागीच मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण घटनास्थळी दाखल झाले.

बातम्या आणखी आहेत...